Ticker

6/recent/ticker-posts

लांडगा आला रे आला, अशी अवस्था नेर तलावच्या पाण्याची = जिल्हाप्रमुख प्रताप जाधव.

       


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

नेर कालव्यास पाणी सोडण्याचे ग्रामविकासमंत्री ना . जयकुमार गोरे   यांनी  आदेश देवूनही  अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्यास नकार दिला .  मंत्री महोदयांच्या आदेशाला केराची टोपली... लांडगा आला रे  ,अशी अवस्था नेर तलावातील पाणी सोडण्याच्या विषयावर झाली आहे , असे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी संगितले .                      जाधव पुढे म्हणाले की ,गेल्या पंधरा दिवसांपूर्वी शिवसेनेने नेर तलाव्यातील पाणी कालव्याद्वारे लवकरात लवकर सोडावे ,अशी भूमिका घेतली होती . पिके पूर्ण सुकून जळून गेली आहेत .राहिलेल्या पिकांना तरी जीवदान मिळावे यासाठी कालव्याला त्वरित पाणी सोडावे ,अशी आक्रमक भूमिका शिवसेनेची होती . या भूमिकेला खटाव, माण  तालुक्यातील दोन्ही मंत्री महोदयांनी यास प्रतिसाद दिला होता .गेल्या दोन दिवसापूर्वी आज कालव्याला व नदीला पाणी सुटणार अशी माहिती मंत्री महोदयांनी पत्रकाच्या माध्यमातून दिली होती ,परंतु आज दोन दिवस झाले तरीसुद्धा नदीला पाणी नाही . कॅनॉलचे सफाईचे काम पूर्ण झाले आहे . दोन दिवसांपूर्वी मंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले ,परंतु अधिकारी उदासीन आहेत या मागचे गुपित नक्की कळत नाही .कोणाच्या आदेशावर यंत्रणा चालते . मोठा गाजावाजा करत जिहे  कठापूरचं पाणी आलं, पाणी पूजन झाली परंतु शेतकऱ्याला पिके ज्या वेळेला बहरात येतात , त्याच वेळेला पाणी मिळत नसेल तर या पाण्याचा खटाव वासियांना काय उपयोग ? भरलेली धरणे व सोशल मीडियावर व्हिडिओ पाहन्याव्यतिरिक्त शेतकऱ्याच्या हातात काही राहिलेले नाही असे दिसते . याविषयी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून असे कोणतेही आदेश आले नाहीत . शेतकऱ्यांकडून जोपर्यंत मागणी अर्ज मिळत नाहीत, तोपर्यंत पाणी सोडता येणार नाही असे सांगण्यात आले आहे  .परंतु मंत्री महोदयांनी तर दोन दिवसांपूर्वीच पाणी सोडा असे आदेश दिले होते त्याचं काय ? किमान 16 ते 17 गावे या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत . शिवसैनिकांचा व शेतकऱ्यांचा अंत पाहू नका येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही .खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात . पाणी पाजण्यासाठी खोऱ्याचे दांडे बसवून ठेवा असे म्हणतात त्यांच्याविरोधातच शेतकरी हातात दांडा घेऊन उभा राहील याची वाट पाहू नका, असा इशारा प्रताप जाधव यांनी दिला .