बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पवारवाडी ( वर्धनगड ), ता. खटाव, जि. सातारा येथील प्रगतशील शेतकरी संतोष हणमंत पवार यांनी फक्त २३ गुंठयामध्ये काढले बटाट्याचे विक्रमी ११ टन उत्पादन.
२३ गुंठयाच्या एका क्षेत्रातील बटाटा काढून झाला असून उर्वरित इतर क्षेत्रात देखील असेच भरघोस उत्पादन निघेल असे संतोष पवार यांनी सांगितले. हा केवळ विश्वास नसून आत्मविश्वास आहे, व तो आत्मविश्वास पुसेगाव येथील वडूज रोडवरील जोतिनाना सावंत यांच्या मे. सावंत ट्रेडर्स यांच्याकडील पंजाबच्या खात्रीशीर ' पुखराज ' वाणाच्या बटाटा बियाण्यावर असून या पुखराज बियाण्यामुळे व विश्वासाची परंपरा असलेल्या मे. सावंत ट्रेडर्स यांच्या विशासानीय बियाण्यामुळेच शक्य झालं असल्याचे त्यांनी सांगितले.
याबरोबर पवार यांनी घेतलेली मेहनत, अपार कष्ट, योग्य बियाण्याबरोबर योग्य वेळी लागवड, नानांचं योग्य मार्गदर्शन, योग्य खतं व पाण्याचे नियोजन या पंचसूत्रीने सगळे जमून आले.
साधारण पणे एवढ्या क्षेत्रात केवळ सव्वादोन टन ते जास्तीत जास्त पाच टन एवढेच उत्पादन निघते. परंतु संतोष पवार यांनी जास्त म्हणजे पाचच्या दुप्पट दहा नव्हे तर दुप्पट पेक्षा जास्त ११ टन एवढा मोठा टप्पा पार केल्याने पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांमध्ये कुतूहल व चर्चेचा विषय असून अनेकांनी या उदयोंमुख प्रगतशील शेतकऱ्यावर शुभेच्छांचा वर्षाव हॊत असून इतर ही शेतकऱ्यांनी या वणाचा वापर करून आर्थिक उन्नती करावी असं जोतिनाना सावंत यांनी सांगितले.





Social Plugin