Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय काँग्रेस मध्ये उमेदवारीसाठी चाचपणी बैठक



 उमरगा प्रतिनिधी, विश्वनाथ स्वामी 

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी येणेगुर जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे व येणेगुर पंचायत समिती गण ओबीसी महिला साठी राखीव असुन तसेच तुगाव पंचायत समिती गण हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे यासाठी येणेगुर गावामध्ये महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

येणेगुर. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज येणेगुर जिल्हा परिषद गट येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उमरगा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नाना भोसले ,व काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार , उमरगा शहर अध्यक्ष विजुभाऊ दळगडे आप्पा , नवनिर्वाचित उमरगा नगरपरिषदेचे नगरसेवक विजय वाघमारे , विशाल काणेकर, बाबा मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय सरवदे, बंजारा व सेवा दल तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, मुळज सोसायटीचे माजी चेअरमन संतोष जाधव, खाजी मुजावर , जिल्हाध्यक्ष सेवा दल अमित रेड्डी , युवक काँग्रेस युवा उपअध्यक्ष मुरूमचे युवा नेते राहुल वाघ , उमरगा ता, काँग्रेस उपाध्यक्ष सतीश मुदकन्ना , अविनाश माळी , सतीश जाधव, संमद वरनाळे, फिरोज मुनशी , सलीम मकानदार , सतीश गायकवाड ,तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील व अनेक कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार, उपस्थित होते. मतदारसंघातील सद्यस्थिती, इच्छुकांची ताकद आणि जनसंपर्क यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने प्रत्येक येणेगुर जिल्हा परिषद मतदारसंघातून ३ ते ४ नावांची प्राथमिक यादी तयार केली असून, लवकरच ती वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात येणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून इच्छुक उमेदवारांची नावे देण्यात आली 

 राष्ट्रीय काँग्रेस मध्ये उमेदवारीसाठी चाचपणी बैठकीत इच्छुकांची गर्दी

येणेगुर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आज झालेल्या चाचपणी बैठकीत अनेक इच्छुकांनी आपला बायोडाटा सादर करत दावा ठोकला आहे. "जो उमेदवार निवडून येण्याची क्षमता (Elective Merit) ठेवतो, त्यालाच संधी दिली जाईल," असे स्पष्ट संकेत पक्षाचे निरीक्षक यांनी दिले आहेत. या बैठकीमुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.

१. काँग्रेस पक्षाचे युवा नेते राजेंद्र घोडके यांच्या स्वगृही दि,04/01/2026 रोजी सकाळी ,11 वाजता 

२. या आढावा बैठकीची प्रमुख उपस्थिती पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना भोसले त्यांच्यासोबत तालुक्याचे निरीक्षक व अध्यक्ष व तालुक्यातील पदाधिकारी आले होते 

 ३. ही बैठक जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहे 

४. इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या व नावे सुचवली, 

५. ही यादी 7 जानेवारी पर्यंत पक्षश्रेष्ठींकडे जाणार आहे, असे निरीक्षक व ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले 

    बैठकीपूर्वी आलेल्या निरीक्षकांचे व तसेच उमरगा नगर परिषद भरघोस मतांनी निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवकांचे सत्कार करण्यात आला व तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित रेड्डी यांनी केले , व कार्यक्रमाची प्रास्ताविकता सतीश मुदकन्ना व काँग्रेस पक्षाचे उमरगा तालुकाअध्यक्ष अर्जुन बिराजदार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले