बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
सातारा जिल्हयामधील सातारा शहरातील शाहूपुरी परिसरातील सातत्याने शरिराविरुध्दचे, मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे सराईत टोळीचा प्रमुख १) प्रेम गणेश पवार वय-२१ वर्षे रा.४६ शुक्रवार पेठ सातारा ता.जि. सातारा यातील टोळी सदस्य २) आनंदा ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने वय-२० वर्षे रा. जिव्हाळा कॉलणी दिव्यनगरी सातारा ता.जि. सातारा. ३) प्रेम आबासाहेब अडागळे वय-२१ वर्षे रा. हिंदवी पब्लीक स्कुल जवळ कुलकर्णी कॉलणी शाहुपुरी सातारा ता. जि. सातारा. ४) अनिकेत सोमनाथ अहिवळे वय-२० वर्षे रा.६५४ मंगळवार पेठ सातारा ता.जि. सातारा. यांचे टोळीवर दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवुन, मालमत्ता हिसकावुन घेवुन, मारामारी करणे, दुखापत पोचवुन, शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने शाहुपूरी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. एस जी म्हेत्रे, यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे संपुर्ण सातारा सांगली, कोल्हापुर, पुणे जिल्हा हद्दीतुन तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी श्री राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा यांनी केली होती.
शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेचर दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवुन, मालमत्ता हिसकावून घेवुन, मारामारी करणे, दुखापत पोचवुन, शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे दखलपात्र यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनसुध्दा त्यांनी आपल्या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या आहेत. त्यांच्या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे सातारा तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर कायदयाचा वचक राहवा याकरीता सर्वसामान्य जनतेतून त्यांचेवर कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
मा.तुषार दोशी, हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचे समोर टोळीचा प्रमुख १) प्रेम गणेश पवार वय-२१ वर्षे रा.४६ शुक्रवार पेठ सातारा ता. जि. सातारा यातील टोळी सदस्य २) आनंदा ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने वय-२० वर्षे रा. जिव्हाळा कॉलणी दिव्यनगरी सातारा ता. जि. सातारा. ३) प्रेम आबासाहेब अडागळे वय-२१ वर्षे रा. हिंदवी पब्लीक स्कुल जवळ कुलकर्णी कॉलणी शाहुपुरी सातारा ता. जि. सातारा. ४) अनिकेत सोमनाथ अहिवळे वय-२० वर्षे रा.६५४ मंगळवार पेठ सातारा ता. जि. सातारा यांची सुनावणी होवुन सदर टोळीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्यये संपुर्ण सातारा सांगली, कोल्हापुर, पुणे जिल्हा हद्दीतुन हद्दीतुन ०२ वर्षे हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता आगामी निवडणुक काळात सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजु कांबळे, शिवाजी भिसे, म.पो.कॉ. अनुराधा सणस शाहुपूरी पोलीस ठाणेचे पो.हवा. महेश बोडरे, अब्दुल खलिफा, पो. कों केतन शिंदे, शुभम चव्हाण यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.








Social Plugin