Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या कामात भ्रष्टाचार .



सीसीटी च्या कामात अंदाजपत्रकास बगल  जिल्हाधिकाऱ्या कडे तक्रारीमधून चौकशीची मागणी  

राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

पुसद वन विभाग अंतर्गत येणाऱ्या दिग्रस वनपरिक्षेत्र कार्यालयच्या आरंभी वर्तुळातील खंडापूर शिवारात मागील पंधरा दिवसापासून सीसीटीचे (सलग समतल चर ) कामे सुरु असून सदर कामे अंदाज पत्रकाला बगल देऊन थातूर मातुर केली जात असून संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय निधी लुटण्याचा प्रकार चालविला असल्यामुळे केलेल्या बोगस कामाची वेळीच चौकशी करून दोषी वर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे दिलेल्या तक्रारीमधून केली आहे.सदर तक्रारीवर राजपाल बनसोड, संजय राऊत, विलास निकम, प्रफुल व्यवहारे, लक्ष्मण चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. खंडापूर वनविभा्गांचे हदीत लाखो रुपयांचे सिसिटी चे कामे जेसीबी मशीनद्वारे केली असून सिसिटी च्या नाल्या ची खोली, रुंदी, व लांबी बघितल्यास खोली कुठे अर्धा फूट, तर कुठे एक फूट खोल खोदून थातूर मातुर कामे केली आहे. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी सीसीटीद्वारे जमिनीत झीरपून व जमिनीची धूप कमी होईल या उद्देशाने केंद्र शासनाकडून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कामे बघितल्यास कंत्राक दाराची मनमानी पाहल्यास संबंधित कामांवर देखरेखीची जबाबदारी असणाऱ्या कर्मचारी,वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा खरा चेहरा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. केंद्र शासनाच्या निधीची उधळपट्टी सुरू असून याची तात्काळ चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराची बिले अदा करण्यात येऊ नये अशी ही मागणी केली आहे. शिवाय प्रतिलिपी म्हणून जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण यवतमाळ, व खासदार संजय देशमुख यवतमाळ - वाशीम लोकसभा यांचे कडे देण्यात आल्या आहे.