अंजनी खुर्द येथे सहा जिल्ह्याचा बस थांबा अखेर मंजूर.
सविस्तर बातमी अंजनी खुर्द येथील युवा नेतृत्व गजू भाऊ गायकवाड अध्यक्ष जनता एज्युकेशन अंजनी खुर्द बरेच दिवसाच्या संघर्षानंतर अंजनी खुर्द येथे बस थांबा मंजूर झाला आहे गजू भाऊ चा दहा महिन्याचा संघर्ष व थांबा मंजूर करून घेण्याचा अखेर यश आले आहे पंचायत समिती सर्कल असून सुद्धा या गावांमध्ये बस थांबण्याची कुठली व्यवस्था नव्हती त्यामुळे शाळेतील मुला मुलींचा येण्या जाण्याचा प्रश्न हा नेहमीच विद्यार्थ्याला अडचण निर्माण होत होती या प्रश्नाला वाचा फोडून गजानन माणिकराव गायकवाड अंजनी खुर्द संघर्ष नायक गजू भाऊंनी कुठले काम अशक्य नसते हे सिद्ध करून दाखवले आहे त्यांच्या दहा महिन्याच्या संघर्षातून सिद्ध होत आहे गावातील व पंचक्रोशीतील ग्रामपंचायतचे ठराव घेऊन वाटेल तिथे स्वतःच्या स्वखर्चाने पाठपुरवठा करत राहिले आणि दहा महिन्यानंतर त्यांच्या संघर्षाला यश आले दिनांक 22 01 2026 गजू भाऊ च्या माध्यमातून सर्व सहा आगाराच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर गजू भाऊच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला गजू भाऊ यांच्याकडे गावातील युवा वर्गातील खंबीर साथ आहे भावी सरपंच म्हणून गजू भाऊची दबक्या आवाजात चर्चा आहे





Social Plugin