Ticker

6/recent/ticker-posts

पोरं सोडून गेली तरी शाळा अजून सुरू आहे"



*निढळ(ता. खटाव)येथील श्री. शहाजी खुस्पे बनले ठाणे महानगरपालिकेत जाय‌ंट किलर*

   बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 सध्याचा जमाना रिल्स व्हिडिओ याचा आहे. या रिल्समध्ये आपण एक व्हिडिओ नेहमी पाहतो की, " पोरं सोडून गेली तरी शाळा अजून सुरू आहे" असे शीर्षक असते, हे शीर्षक शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना नामक पक्षाला तंतोतंत जुळते. राजकारणात प्रस्थापितांची बाजू नेहमीच वरचढ ठरत असली तरी शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य घरातील अतिसामान्य अशा शिवसैनिकांना आमदार,खासदार, मंत्री व मुख्यमंत्री केले. काही लोक एवढे मिळून सुद्धा मूळ पक्षाला जय महाराष्ट्र करून दुसऱ्या पक्षात गेले, परंतु शिवसेनाप्रमुखांनी कधीही हार न मानता टपरीवाला, रिक्षावाला किंवा शिपाई अशा लोकांना राजकारणात मानाची पदे दिली. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ता पासून नेते बनवण्याचा कारखाना चालू ठेवला आहे याचीच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभागात एका सामान्य शिवसैनिकाला नगरसेवक बनवले म्हणूनच सुरुवातीला आम्ही म्हटले आहे की जरी पोर सोडून गेली तरी शाळा अजून सुरू आहे.

         2022 च्या शिवसेना फुटीनंतर माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार खासदार सोडून गेले. लोकसभा निवडणुकीत त्यांना जेमतेम यश भेटले तरी विधानसभा निवडणूक श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. आणि नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत यश भेटले नाही. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. ठाणे महानगरपालिकेत त्यांच्या पक्षाची सर्व नगरसेवक श्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. परंतु नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे राहत असलेल्या प्रभागात श्री शहाजी खुस्पे हे मूळ गांव निढळ(ता. खटाव, जि. सातारा) ह्या शिवसैनिकांने माजी महापौर व चार वेळा निवडून आलेले श्री अशोक वैती यांचा पराभव करून जायंट किलर ठरले.

       गेली दहा वर्षे श्री शहाजी खुस्पे प्रभाग क्रमांक 13 ज्ञानेश्वरनगर जनसेवेचे प्रचंड काम केले आहे. कोरोना काळात नातेवाईक तोंड फिरवत असताना श्री खुस्पे हे सामान्य लोकांसाठी देवदूत बनले होते. याच जनसेवेच्या जोरावर त्यांनी श्री अशोक वैती सारख्या मातब्बर व्यक्तीचा तब्बल बारा हजार मतांनी पराभव केला. जनतेच्या मनातील जनसेवक आज नगरसेवक झाला. येणाऱ्या काळात जनसेवेची अनेक काम करून श्री. शहाजी खुस्पे राजकारणात समाजकारणाचे मू्र्तीम‌ंद उदाहरण ठरतील अशी आशा या सातारच्या सुपुञाकडून ठाणेकर नक्कीच ठेवत असतील. कारण  शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगत असत की, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हेच शिवसैनिकाचे ब्रीद असले पाहिजे.