*अश्विनी गाभणे यांनी सादर केला एकपात्री प्रयोग*
मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगांव ता 4 - सौ अश्विनी गाभणे यांनी सादर केलेल्या ' मी सावित्रीबाई फुले बोलतेय ' या एकपात्री प्रयोगाने आबालवृद्ध मंत्रमुग्ध झाले.मालेगांव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारंभात ता 3 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता त्यांनी हा प्रयोग सादर केला याद्वारे त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जिवनपट उपस्थितांसमोर मांडला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचेअध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अरविंद गाभणे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था संचालीका निर्मला गाभणे , अश्विनी गाभणे, रोहिणी गाभणे,आशा गाभणे,मुख्याध्यापिका नीता भालेराव, व्यवस्थापक कपिल भालेराव , पालक प्रतिनिधी म्हणून कमलताई अवचार , सोनाली इंगोले म्हणून उपस्थित होते.
प्रा. अरविंद गाभणे म्हणाले की सावित्रीबाई फुले ह्या पाहिल्या विद्यार्थिनी, पाहिल्या शिक्षिका, पाहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्या कवीयत्री होत्या . तह हयात त्यांनी समाज सेवा केली असे ते म्हणाले इयत्ता दुसरी व तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी "फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?" हे गाणे सादर केले इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नृत्य सादर केले. यावेळी कपिल भालेराव, शिक्षिका पूजा शर्मा, अनुपमा भांदुर्गे विद्यार्थी ईश्वरी मोरे,ओम शिंदे, रुद्र दांडगे,धनुष अवचार, प्रिया देवकर,संयुक्त लोखंडे, स्वराज इंगळे,निधी जाधव,खुशी कुटे, स्वरा पवार,अनुष्का आढाव, धनश्री अंभोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुजित अवचार, आकाश गाभणे, अनुपमा भांदुर्गे,पूजा शर्मा, नीलिमा गोरे,राधा काळे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता भालेराव, व शिक्षिका स्वाती सुरडकर, केले प्रास्ताविक श्वेता जैस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी राऊत यांनी केले.
----
फोटो ओळी - अश्विनी गाभणे यांनी एकपात्री प्रयोग सादर केला





Social Plugin