Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या प्रकरणात…हल्लेखोर उबेद पटेल अटकेत…पण ‘सूत्रधार कोण?’



(राहुल वानखडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी)

दिनांक १/७/२०२६

अकोला जिल्ह्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रभावशाली मुस्लिम चेहरा हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काल (६ जानेवारी) दुपारी अकोट तालुक्यातील मोहाळा गावात, मशिदीत नमाज अदा करून कुराणाचे वाचन करीत असतानाच मागून येवून हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांना पोटावर आणि मानेवर गंभीर वार करण्यात आले होते. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या पटेल यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेत. या हल्ल्यामागे राजकीय आणि कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी प्रकरणाने आता राजकीय कटाचा गंभीर वळण घेतलं आहे. मुख्य हल्लेखोर उबेद पटेल याला अकोट तालुक्यातील पणज गावातून स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. मात्र तपास जसजसा पुढे जातोय, तसतशी मोठ्या राजकीय नावांची एंट्री होत आहे.

आरोपींच्या यादीत धक्कादायक राजकीय नावं

हिदायत पटेल हल्ला प्रकरणात अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण ५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये समावेश आहे…अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, काँग्रेस नेते व जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजीव बोचे, मुख्य हल्लेखोर उबेद पटेल, आणखी एक संशयित आरोपी या सर्वांवर खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र आता हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर IPC 302 (खून) चे कलम वाढणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कुटुंबीयांची तक्रार, राजकीय वर्तुळात खळबळ

पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला आहे. तक्रारीत थेट राजकीय हस्तक्षेप आणि पूर्वनियोजित कटाचा आरोप करण्यात आल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा केवळ वैयक्तिक वाद नाही, तर सुनियोजित राजकीय कट आहे,” असा दावा कुटुंबीयांकडून केला जात आहे.