Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेज मध्ये सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी




प्रतिनिधी :  विजय गायकवाड

   रिसोड:- येथील स्व.पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान  महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा डॉ प्रकाश यु. हणवते यांच्या नियोजनाखाली नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची  संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. एम.एन.गायकवाड यांनी आपले विचार मांडताना "नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिले तर बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. ते हिंदुत्ववादी, नेता, व मराठी लोकांचे समर्थक होते. त्याचबरोबर 'सामना' या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते" असे मत व्यक्त केले. तर सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा डॉ हणवते यांनी दोघांच्याही जीवनावर प्रकाश टाकून या थोर पुरुषांचे विद्यार्थ्यांनी विचार आत्मसात करून स्वतःचे करिअर घडविले पाहिजे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा डॉ आम्रपाली भगत यांनी तर आभार प्रा डॉ प्रकाश हनवते यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.