Ticker

6/recent/ticker-posts

बुधमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण अंतर्गत ग्रामीण उद्यान कार्यानुभव कार्यक्रम 2025-26 आयोजित येथील उद्यानदुत आदेश जाधव  ,राम भोईटे  ,मयुर गाढवे ,गौरव डांगे  ,प्रणव भोसले  ,रोहन बनकर  यांनी बुधमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ. सुजाता बोराटे व उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , बुध उपकेंद्राच्या वैदयकिय अधिकारी  डॉ.सौ.सोनल जाधव  उपस्थित होते. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ पार पडला.   आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात केली. या शिबिरासाठी बुध ग्रामस्थांनी भरगोस प्रतिसाद दिला. यामध्ये २० रूग्णांची तपासणी करण्यात आली . डॉ .सौ.सोनल जाधव .यांनी उद्यानदुतांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला हे जाहीर केले.

कार्यक्रमासाठी, प्राचार्य.डॉ.एस.डी. निंबाळकर, प्रा. डॉ.यु.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा.ए. डी. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जे.व्ही. लेंभें व प्रा.डॉ.ए.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला.