.
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुका लोकसाहित्य कट्टा यांच्या वतीने तिसरा अभयारण्य साहित्य मेळा रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी मायणी (ता. खटाव) येथील सुप्रसिद्ध मायणी पक्षी अभयारण्यात आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण जीवन, लोकसंस्कृती, लोककला, कविता, कथा, अनुभवकथन, वैचारिक संवाद यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या साहित्य मेळ्याचे आयोजन करण्यात येते. निसर्गाच्या सान्निध्यात साहित्यिक संवाद घडावा, नवोदित लेखकांना प्रेरणा मिळावी आणि ज्येष्ठ साहित्यिकांचा मार्गदर्शनाचा लाभ मिळावा, हा या मेळ्याचा प्रमुख हेतू आहे.
या साहित्य मेळ्यामध्ये कवी संमेलन, अनुभव कथन, लोकसाहित्य वाचन, मुक्त संवाद, विचारमंथन तसेच स्नेहमेळा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये खटाव तालुक्यासह परिसरातील लेखक, कवी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
साहित्य, निसर्ग आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेला हा अभयारण्य साहित्य मेळा ग्रामीण साहित्य चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.





Social Plugin