बुध दि . (प्रकाश राजेघाटगे):
एसटी महामंडळाच्या सेवेत सलग १० वर्षे एकही अपघात न करता, सुरक्षित प्रवासाची परंपरा जपल्याबद्दल पुसेगावचे सुपुत्र आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश मदने यांना एसटी महामंडळाकडून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल पुसेगाव ग्रामस्थांकडून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुरक्षित प्रवासाचा 'दशकपूर्ती' सोहळा
गणेश मदने यांनी गेल्या १० वर्षांत लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुरक्षितपणे पोहोचवले आहे. घाट रस्ते, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी दाखवलेले कौशल्य आणि संयम वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे प्रवासी नेहमीच निर्भयपणे प्रवास करतात. मदने यांनी आपल्या सुरक्षित प्रवासाचा दशक पूर्ती सोहळा निर्विवादपणे पूर्ण केला.यांच्या कौशल्याचा आणि जबाबदारीचा सन्मान
एसटी महामंडळाने त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन एसटी महामंडळाचे अधिकारी प्रताप पाटील व राऊत यांनी पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे. "एसटी महामंडळाचा प्रवाशांवरील विश्वास टिकवून ठेवण्यात मदने यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष चालकांचा मोठा वाटा आहे," अशा शब्दांत महामंडळाचे अधिकारी प्रताप पाटील यांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
पुसेगाव ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव,"
गणेश मदने हे केवळ एक कुशल चालकच नाहीत, तर सुवर्णनगरी पुसेगाव ग्रामपंचायतीचे धडाडीचे सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या मित्रपरिवाराने आणि ग्रामस्थांनी त्यांच्या पुढील वाटचालीस आणि भावी 'विना अपघात' सेवेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
जबाबदारीचे भान असलेल्या कुशल चालकाचे एसटी महामंडळाला मोठे योगदान आहे एक मित्र म्हणून"तुमच्या या संस्मरणीय कामगिरीचा आम्हा सर्व ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे. तुमची सेवा अशीच अविरत आणि सुरक्षित सुरू राहो!"—ॲड तोडकर व ग्रामस्थ, पुसेगाव.





Social Plugin