●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
●मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते केरबाजी सटवाजी गायकवाड यांना रविवार दि.१८ जानेवारी रोजी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे सामाजिक,राजकीय योगदानाबद्दल 'डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पुरस्कार' भव्यदिव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
समाज,राजकीय जीवनात वावरत असताना स्वतःच्या जीवनाला सकारात्मक आकार देत,इतरांनाही मार्गदर्शन करीत पुढे जाण्याची वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्यांकडून झाली पाहिजे.येथील केरबा गायकवाड यांनीही हा मार्ग आपल्या जीवनात यशस्वी केला आहे.त्यांच्या याच नितळ,निपक्ष कार्याची दखल घेऊन मेक्सिकोतील युनिव्हर्सिटी तळोसा
या विद्यापीठ संस्थेच्या वतीने त्यांना सामाजिक रत्न पुरस्कार देऊन मान्यवर पदाधिकाऱ्यांकडून सन्मानित करण्यात आले.यावेळी इंडिया कंट्री संस्थेचे चेअरमन विद्यमान संचालक डाॅ.कट्टा बोमन,शिवाजी भुजंग वाघमारे,जाकीर शेख आदिंची उपस्थिती होती.या आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गायकवाड व मिञपरिवार,कर्मचारी, पञकार,गावातील प्रतिष्ठित नागरिक,ग्रामआजी,माजी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.





Social Plugin