बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
या कार्यक्रमाला वीर पत्नी, फौजी पत्नी तसेच जयहिंद फाउंडेशनचे सदस्य हजर होते.
वीर पत्नी सौ शुभांगी ज्ञानेश्वर जाधव ( धकटवाडी), वीर पत्नी सौ पुनम चंद्रकांत जाधव ( काताळगेवाडी), वीर पत्नी सौ.अश्विनी दत्तात्रय सत्रे ( सत्तेवाडी) वीर पत्नी सौ अश्विनी गणेश इंगळे ( शिरसवडी) , वीर पत्नी सौ सोनाली बोडरे ( खटाव) ,वीर पत्नी सौ प्राजक्ता बुधे ( अंबवडे) वीर पत्नी सौ. प्रियांका विजय शिंदे ( विसापूर) , वीर पत्नी सौ रीना फडतरे ( कोरेगाव), वीर पत्नी सौ सविता कृष्ण वाघमारे ( हेळगाव पाडळी), वीर माता मंगल यादव ( कवठे), वीरमाता सुवर्णा शेळके ( खटाव) , उपस्थित होत्या .
तसेच कार्यक्रमाला लाभलेले मुख्य अतिथी महिला पोलीस अमृता चव्हाण, एडवोकेट स्मिता जगताप, डॉक्टर सुजाता शिंदे ,डॉक्टर धनश्री पाटील, महिला पत्रकार सौ. नम्रता भोसले या सर्व मान्यवर महिलांनी वीर पत्नींना खूप छान मार्गदर्शन केले. त्यांच्या आरोग्यविषयक ,त्यांच्या सुरक्षिततेबद्दल तसेच कायद्याची विशेष माहिती दिली .
तसेच जय हिंद फाउंडेशन सातारा जिल्हा महिला प्रमुख सौ उर्मिलाताई , जय हिंद फाउंडेशन तालुका खटाव अध्यक्षा सौ हेमलता किसन फडतरे आई*, सचिव पूनम यशवंत साळुंखे ,चंद्रकांत इंगळे (सदस्य) आणि इतर खटाव टीमचे सभासद कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले . वीर पत्नीचे मनोगत झाले, हळदी कुंकू कार्यक्रम झाला , त्यानंतर खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला . सूत्रसंचालन पूनम साळुंखे यांनी केले तसेच वीर पत्नींना इतर बक्षिसे आणि पैठणी देण्यात आली. अशा प्रकारे सर्व वीर पत्नी, फौजी आजी माझी पत्नी तसेच इतर महिला सर्वांनीच आजच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचा आनंद घेतला .
कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी जयहिंदच्या ह्या अनोख्या कार्याचे भरभरून कौतुक केले .





Social Plugin