Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न.

 





नांदगाव खंडेश्वर | दिनांक : 17/01/2025

नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रुग्णालय परिसरात कचरा साचलेला असून वॉर्ड व शौचालयांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल होत असतात. मात्र नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिण्याच्या पाण्याजवळही अस्वच्छता आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

“रुग्ण आधीच आजारी असतात, अशा अस्वच्छ वातावरणामुळे त्यांची प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता आहे,” असे एका रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. याबाबत रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, लवकरच साफसफाई व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. — नगरसेवक -अविनाश ब्राम्हणवाडे व राहुल गेडाम उपस्थित - अभिषेक पवार, शुभम ब्राम्हणवाडे,श्रीहर्ष भगत(विक्की)