Ticker

6/recent/ticker-posts

श्री रामचंद्र जाधवसर यांचे कार्य समाजासाठी उल्लेखनीय व प्रेरणादायी - रवींद्र निकम



जनता सोशल फाउंडेशन च्या वतीने साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

बुध दि . [प्रकाश राजेघाटगे] 

भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री रामचंद्र जाधव सर यांनी आपल्या ६५ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजासाठी केलेले कार्य हे उल्लेखनीय व प्रशंसनीय आहे. असे गौरव उद्गार श्री रवींद्र निकम यांनी व्यक्त करून, जाधव सरांनी समाजासाठी केलेले लेखन त्यामध्ये प्रामुख्याने जनक शोधांचे, कुळूरवाती, गाव कुसाबाहेर ही पुस्तके समाजाच्या येणाऱ्या पिढीसाठी तसेच सर्व सामान्य विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक अशी आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांना फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असे मत रवींद्र निकम यांनी व्यक्त केले.
भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे राज्य सरचिटणीस श्रीरामचंद्र जाधव सर यांना नुकतेच जनता सोशल फाउंडेशन करंदी तर्फ कुडाळ ता. जावळी यांचे वतीने ह.भ.प अमोल महाराज यांचे हस्ते साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी श्री रवींद्र निकम बोलत होते. माजी सरपंच प्रगतशील शेतकरी कैलासवासी प्रल्हाद रंगू निकम यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, कै. लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्था व सातारा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था संचालक श्री रवींद्र प्रल्हाद निकम व त्यांच्या पत्नी सौ वैशाली निकम यांचे सौजन्याने हा साहित्यरत्न पुरस्कार ,स्मृतीचिन्ह मृत्युंजय कादंबरी व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वर्षातील जाधव सर यांचा हा तिसरा गौरव आहे.सातारा जकात वाडी येथे मा. खासदार शरद पवार यांचे हस्ते जीवनगौरव पुरस्कार, इचलकरंजी येथे पद्मश्री लक्ष्मण माने यांचे हस्ते साहित्यरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. श्री रामचंद्र जाधव सर यांनी विविध स्तरातून कार्य केले आहे. श्रीपतराव पाटील विद्यालयात दरवर्षी प्रथम क्रमांक येणारे विद्यार्थ्यांसाठी आकर्षक बक्षिसे व स्मृतिचिन्ह , कै. अभयसिंह राजे भोसले ग्रंथालयासाठी संस्थापकीय उपाध्यक्ष या नात्याने भरीव स्वरूपाच्या मदत, तसेच भटक्या विमुक्त समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा लढा दिला त्यांच्या येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील,अशी अनेक कार्य केली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत या ठिकाणी पुरस्काराच्या रूपाने मिळाली असल्याचे श्री रवींद्र निकम यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी जरंडेश्वर कारखाना सेवानिवृत्त एमडी आर डी फाळके, हसत खेळत चे संपादक रुपेश जाधव, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब निकम, शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा स्कूल कमिटी चेअरमन सौ.प्रतिभा चव्हाण, धनंजय जगताप, प्राचार्य अमर वसावे, आदर्श प्राथमिक शाळा करंजे मुख्याध्यापिका सौ.रणबागले विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.