बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत असणारे रिपब्लिकन सेनेचे नेते रमेश उबाळे यांनी सुचविलेली सर्व कामे आपण मार्गी लावून त्यांना आपण खासदार म्हणून सर्व ते सहकार्य करु अशी ग्वाही श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले यांनी दिले
सातारा नगर परीषदेत घावघवीत यश मिळविल्याबद्दल जलमंदिर पॅलेस येथे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेत रिपब्लिकन सेनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी शाल, श्रीफळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती भेट देत तसेच पेढा भरवून सत्कार केला त्यावेळी खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले बोलत होते.
खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, रमेश उबाळे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात उत्तम काम करत आहेत. त्यांनी सुचविलेली सर्व विकासकमांमध्ये आपण प्रधान्याने लक्ष घालून मार्गी लावू. रमेश उबाळे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार तळागाळात पोहचवण्याचे मोठे कार्य करत आहेत. ज्या संविधानावर आज देशाचा गाढा अखंडपणे सुरू आहे. हे संविधान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांनी स्वखर्चाने लाखो संवीधानाच्या प्रती छापून घेऊन या प्रती मोफत समाजापर्यंत पोहचवत आहेत यामुळे लोकशाहीतले आपले अधिकार काय आहेत हे लोकांना समजेल. त्यांनी आपले कार्य असेच सुरु ठेवले पाहिजे. त्यांना आपण सर्व ते सहकार्य करु.
रमेश उबाळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये चालू असलेले एमएसआरडी व विविध शासकीय निधीतून सुरु असलेले रस्ते वेगाने पूर्ण व्हावेत, जिल्ह्यात केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी आणावा यासाठी आपण खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांची भेट रायतेच्या राजाचे आम्हां मागासवर्गीय समजावरती विशेष प्रेम आहे, जिल्ह्यातील सर्व प्रश्न महाराज साहेबांच्या माध्यमातून सोडवले जात आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. कार्यकमास जिल्हाध्यक्ष विशाल भोसले, जिल्हा महासचिव नितिन रोकडे महिला जिल्हाध्यक्ष पद्मा सुतार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा धोत्रे,तालुकाध्यक्ष दीपक गाडे, शहराध्यक्ष गौतम रणदिवे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गायकवाडमहिला जिल्हा महासचिव ज्योती गंगावणेउपस्थित होते.





Social Plugin