बिलोली प्रतिनिधी - राजेश अमेटवार
बिलोली : रामपूर येथे मोठया उत्साहात नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडी च्या नांदेड जिल्हा दक्षिण जिल्हाध्यक्षपदी श्री शंकर महाजन साहेब यांची निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने दि. 17 जानेवारी 2026 रोजी रामपूर येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महाजन साहेबांचे विश्वासू खांदे समर्थक बोडके शंकर, तालुका सदस्य तसेच पत्रकार मारोती एडकेवार, आमेटवार राजेश या सर्वांचे पहिल्यांदा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित गावातील सरपंच निखिल पा. मुंगडे, पोलीस पाटील प्र. सचिन मिरजे, योगेश मुंगडे, मारोती पा. तडखले, अमोल मिरजे, अशोक धडे,हणमंत मेंडगुळे, गजानन उलगडे, बबन सीतापल्ले, गणेश मिरजे, दिगांबर हांडे, बसवंत तडखले तसेच गावातील प्रतिष्टात नागरिक आणि संविधान प्रेमी व जिल्हाध्यक्ष महाजन साहेबांचे समर्थक त्यांच्या वर विश्वास ठेऊन पक्ष वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे गावातील युवा वर्ग उपस्थित होते.सर्व नागरिक व पत्रकार व संविधान प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व तसेच महाजन साहेबांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.या सर्वानी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून महाजन यांनी सर्व गावकऱ्याचे मान राखून हा सत्कार सोहळा स्वीकारले त्याबद्दल सर्वानी त्यांचे आभार मानले.





Social Plugin