Ticker

6/recent/ticker-posts

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती भार्डी जिल्हा परिषद शाळेत उत्साहात साजरी



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

स्त्री शिक्षणाच्या जनक तथा देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अंबड तालुक्यातील भार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक,सामाजिक व स्त्रीमुक्तीच्या कार्यास अभिवादन केले.सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्याय,रूढी व अज्ञानाविरुद्ध लढा देत शिक्षणाचा दिवा पेटवला, त्यांच्या कार्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रांत प्रगती करत असल्याचे वक्त्यांनी यावेळी नमूद केले.

या कार्यक्रमास गावातील सरपंच,उपसरपंच, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थ,पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा जपावा,असे आवाहन केले.

शाळेतील शिक्षकवृंदाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती पोहोचावी आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित व्हावे,या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या उपक्रमामुळे भार्डी परिसरात सामाजिक जाणीव व शैक्षणिक प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.