Ticker

6/recent/ticker-posts

विक्रमशिला प्राथमिक निवासी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

दि 3 जानेवारी रोजी अंबड शहरातील विक्रमशिला प्राथमिक निवासी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा तैलिक महासभा अध्यक्ष जालना श्री बळीरामजी राऊत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंडित गायकवाड तसेच गुरुकुल चे संचालक मा श्री संजय जाधव सर हे होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश हरणे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद मस्के सर यांनी केले शाळेचे विद्यार्थी अभिजित लोणकर,गायत्री जाधव,शिवराज सोमासे,विश्वास पोटे यानी भाषणे केली व वर्ग पाचवीची विद्यार्थिनी कु.गायत्री जाधव हिने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर माहिती सांगितली.यावेळी बळीरामजी राऊत यांनी कु.गायत्री जाधव ला बक्षिस भेट दिले.शेवटी आभार प्रदर्शन श्री संजय जाधव सर यांनी केले यावेळी श्री संजय जाधव सर,योगेश हरणे सर,प्रमोद मस्के सर,सौ.शितल जाधव मॅडम,सौ.योगिता शिंदे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.