Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळातील बोगस अपंग अनुदानित शाळांविरोधात अपंग जनता दल आक्रमक.



* २६ जानेवारीला अमरावती प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

   राज्य शासन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, विकास व पुनर्वसनासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करत असताना, यवतमाळ जिल्ह्यातील काही अनुदानित अपंग शाळा व कार्यशाळांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असूनही मोठ्या प्रमाणावर अनुदान घेतले जात असल्याचा गंभीर आरोप अपंग जनता दल यांनी केला आहे.

अपंग जनता दलच्या वतीने प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त, अमरावती यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात संजीवनी निवासी मतिमंद पाठशाळा (यवतमाळ), पुरुषोत्तम इंगोले निवासी मतिमंद विद्यालय (दारव्हा), निवासी मतिमंद विद्यालय काली दौलत खान (ता. आर्णी), निवासी मतिमंद विद्यालय राळेगाव तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम निवासी अपंग कार्यशाळा (यवतमाळ) या संस्थांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२६ रोजी अमरावती येथील प्रादेशिक समाज कल्याण कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वेळेत कारवाई न झाल्यास सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.अशी माहिती यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दिपक जाधव यांनी दिली