●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
●आदमपूर:परिसरातील असहाय दिव्यांग, निराधार वयोवृध्दांसह शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आधार देत, त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पेंटे यांनी केले.
बिलोली तलुक्यातील आदमपूर येथील माजी सरपंच तथा बिलोली तालुका सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पेंटे यांनी आपल्या वाढदिवसावरील अनावश्यक खर्चास बगल देत वाढदिवस साधेपणाने साजरा करीत तालुक्यातील केरूर येथे दिव्यांग मेळावा आयोजित करून अटकळी गणातील सर्व दिव्यांग, निराधार वयोवृद्धांसह शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास आर्थिक केरूर येथे दिव्यांग मेळाव्यात जाणून घेतल्या समस्या मदत करीत ब्लॅकेट व साडी चोळी वाटप करूत मायेचा आधार दिला. यावेळी बोलताना पेंटे यांनी निराधारांना दरमहा दिले जाणारे मानधन वेळेवर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. संबंधितांना टेबलाखालून दिल्यानंतर लगेच मानधन सुरू होते, हा प्रकार थांबला पाहिजे, तसेच बिलोली पंचायत समिती येथे दिव्यांगाचे साहित्य वाटप न केल्याने धुळखात पडले असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
यावेळी बाळासाहेब पाटील खतगांवकर, बिलोलीच्या माजी नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, रवी पाटील खतगावकर, गिरीधर पाटील, शंकर आचेवाड, गणेश हांडे, बालाजी रानवळकर, शांताबाई चिंतले, गंगाधर अनपलवार, अंबादास शिनगारे, बालाजी सुगावे, निळकंठ पाटील, भिमराव तरटे, गोविंद पेटेकर, भास्कर तरटे, हरी राठोड, श्रीरामे मारोती, सुभाष अमोघे, इब्राहिम पटेल, बालाजी नाईक, अयुब पटेल, किशन जाधव, भगवान पाटील, यासह दिव्यांग, निराधार लाभार्थी उपस्थीत होते.





Social Plugin