पारनेर प्रतिनिधी श्री भानुदास आग्रे
पारनेर :- चालू असलेल्या कोरठण खंडोबाच्या यात्रेनिमित्त गंगाखेड मतदार संघाचे मा.आमदार सिताराम मामा घनदाट यांचे मुळगाव नांदूर पठार येथे तीन दिवस सहकुटुंब समवेत आगमन झाल्यावर ग्रामस्थानी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
पारनेर तालुक्यातही प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या कोरठण खंडोबा वर नितांत श्रद्धा असणारे घनदाट मामा दरवर्षी आपल्या कुटुंबासमवेत दरवर्षी तीन दिवसासाठी गावी येत असतात .
कालचे दर्शन झाल्यावर आमदार घनदाट मामा यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला ,गावातील चाललेली विकासकामे स्वतः जाऊन पाहिली ,त्यांच्याच माध्यमातून चालू असलेले श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे ,मामानी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांना लवकरात लवकर काम उरकून घेण्याच्या सूचना केल्या ,तसेच विविध विषयावर घनदाट मामा यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.
यावेळी घनदाट मामा यांचे सुपुत्र आणि अभ्युदय बँकेचे मा .चेअरमन संदीप दादा घनदाट ,भावी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र राजदेव ,नांदूर पठार गावचे सरपंच आणि खासदार निलेश लंके साहेबांचे स्वीय सहाय्यक संदीप चौधरी ,रामदास वलवे सर ,बाबाजी चौधरी सर ,पंढरी आग्रे सर ,चेअरमन नारायण राजदेव ,भानुदास आग्रे माजी सरपंच ,दत्ता चौधरी तंटा मुक्ती अध्यक्ष ,विष्णू घोलप ,तलाठी मच्छिंद्र उंडे , सुदाम आग्रे ,गोविंद घोलप ,हरिभाऊ घोलप ,राहुल राजदेव ,अभिषेक दिवेकर ,अनिकेत देशमाने ,मोहन शिंदे ,स्वप्नील राजदेव ,संतोष चौधरी ,ज्ञानदेव चौधरी , कचर चौधरी ,दत्तात्रय आग्रे ,रामचंद्र देशमाने ,भाऊसाहेब चौधरी संभाजी चौधरी ,बाबाजी चौधरी तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी आमदार घनदाट म्हणाले की ,माझी गावाबद्दल ची तळमळ वेगळ्या पद्धतीची आहे ,आज खऱ्या अर्थाने जो गावचा विकास झाला आहे आणि चालू आहे ,माझ्या स्वप्नातील नांदूर पठार आज मला पहायला मिळाले याचा सर्वस्वी आनंद मला आहे ,मी माझ्या मायभूमीचे ऋण कधी विसरणार नाही.यावेळी गावचे अनेक पदाधिकारी ,मुंबईकर ,पुणेकर मंडळ उपस्थित होते .





Social Plugin