साहेबराव अंभोरे @ ग्रामिण प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील महारचिकना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमासाठी गावचे सरपंच शिवाजीराव ढाकणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धवराव ढाकणे , मुख्याध्यापक पी.डी.अंभोरे यांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच बाल आनंद मेळाव्याची फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जिल्हा परिषद शाळेमधील मुलांना व्यवहारज्ञान, खरेदी विक्री नफा तोटा मालांची जाहिरात ग्राहकांशी संवाद कौशल्य इत्यादी उद्दिष्टे शाळेने समोर ठेवून या बाल आनंद मेळाव्याचेआयोजन केले होते. बाल आनंद मेळाव्यामध्ये प्रेमाचे पेढे प्रीतीचा लाडू हर्षची पाणीपुरी मयूरचे बटाटा पोंगे समीक्षेचा गोड संत्रा, समर्थ ची पाणीपुरी, यश चे गुलाबजाम, रियाचे पॅटीस , अनुरागचा चिवडा, अश्विनी आलू पराठा असे असंख्य पदार्थांची रेलचेल गावकऱ्यांनी अनुभवली. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा सदरील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. गावातील आजीबाईंनी सुद्धा पाणीपुरीचा आस्वाद पॅटीसचा आस्वाद घेतला. गावातील पालक आदरणीय बद्रीनारायण गावडे,नागेश घुगे अनिल ढाकणे, विशाल सदावर्ते गजानन हरणे, रामेश्वर तांदुळे, व गावातील नागरिकांनी तसेच सर्व तरुण मुला-मुलींनी उपस्थिती दर्शवून मुलांनी बनवलेल्या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतला. गावातील सर्व नागरिकांनी विद्यार्थ्यांची संवाद कौशल्य तसेच खरेदी विक्री बघून थक्क झाले व शाळेच्या अशा उपक्रमशील प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी.डी .अंभोरे सर, श्री. कृष्णा सिल्लोडे सर, श्री बालाजी लोखंडे सर, श्री शिरसागर सर, तसेच सौ प्रणिता मॅडम यांनी मेहनत घेतली.





Social Plugin