देगलूर : तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक नगरी येरगी येथे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सदरील नूतन इमारतीचे उद्घाटन सरपंच संगीता शंकरप्पा मठवाले यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी नवीन ग्रामसचिवालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर बालविवाह प्रतिबंधाची, मतदान जनजागृतीची, कुष्ठरोग निर्मूलनासाठीची शपथ सर्वांना देण्यात आली. यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात येऊन नूतन ग्रामसचिवालयाच्या इमारतीची उद्घाटन सरपंच संगीता मठवाले यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील ग्रामसचिवालयाच्या नवीन इमारतीत सोलार प्लांट बसवण्यात आले असून ग्रामसचिवालयामध्ये सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,ग्राम विकास अधिकारी,कार्यालय व संगणक हॉल, त्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी वेगवेगळी स्वतंत्र कक्ष बांधण्यात आली आहेत. यांच्यासोबतच गावातील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी वाचनालय आणि त्यासोबतच अभ्यासिकेचे नियोजन या इमारतीत करण्यात आले असून त्याचे संपूर्ण काम होण्यास अवधी आहे.
संतोष पाटील म्हणाले की गावातील विद्यार्थ्यांना एकत्र शांत बसून अभ्यास करता यावा, लाईट गेल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी वीज सेवा पुरवण्यात येणार आहे. ग्राम सचिवालयाच्या उद्घाटन प्रसंगी संगीता मठवाले, संतोष पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार ,विठाबाई अशोक बरसमवार, बालाजी तल्लारवार, अशोक वाघमारे, कोंडाबाई पुंडलिक वाघमारे, सुशीलाबाई सुरेश सोमवार, वर्षा गजानन सूर्यवंशी, बालिका पंचायत राज समितीचे सरपंच अंजली वाघमारे, उपसरपंच पूनम सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी तथा सचिव महादेवी दाणेवार, पोलीस पाटील शिवकांता भुरळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिता बागेवार, अश्विनी पांचाळ, मोनिका माळगे, महादेवी कुंचगे, रुक्मिणी भुरळे, रितिका चिटकुलवार, मोनिका माळगे, अंगणवाडी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद शाळा येथील सर्व कर्मचारी व गावातील सर्व प्रतिष्ठित महिला पुरुष नागरिक,युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin