Ticker

6/recent/ticker-posts

रांजणगांवदेवी विदयालयात प्रजासताक दिन विविध कार्यक्रमाच्या जल्लोषात साजरा.

 


रांजणगांवदेवी ( प्रतिनिधी ) 

आज देशाचा ७७ वा प्रजासताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला हा रांगणगांवदेवी येथील वै. ह भ प बन्सी महाराज तांबे माध्यमिक विद्यालय जि.प प्रा.शाळा रांजणगांवदेवी ; वाकचौरे वस्ती असा तीन ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला या मध्ये. धजारोहना नंतर सामुदाईक कवायत घेण्यात येऊन विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर भाषणे झाली  विषयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते  विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा यामध्ये मिळविलेल्या यशाचे विदयार्थ्यांना भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात आले 

यामध्ये कै आबासाहेब कडू पाटील गुणात्मक योजना प्रगतशिल शेतकरी सोपान काका पेहेरे कै धनंजय कडू यांचे कडून प्रत्येक वर्गात प्रथम द्वितिय तृतीय क्रमांकाने गुण मिळविणाच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले तर गरजू विद्यार्थ्यांना प्रशांत भिसे यांनी आईच्या स्मरणार्थ वह्यांचे वाटप करण्यान आले तर गावचे भूमिपुत्र राजेंद्रजी लोखंडे साहेब यांनी इयत्ता दहावी मधील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उज्वल यश मिळावे या दृष्टीने २१ अपेक्षित संचाचे ४७ संच वाटप करुण विद्यालयातील साधारण २५० विद्यार्थी विद्यार्थीनींना शालेय ड्रेस चे वाटप करण्यात आले व भविष्यात शाळेची गरज ओळखून मदत करण्याचे जाहीर केले

 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत भरघोस यश संपादन करावे तेंव्हा च या दिलेल्या अपेक्षितांचा फायदा झाला असे समजेल या राष्ट्रीय कार्यकमाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे हे होते तर प्रमुख पाहूणे समर्थ कडू  सतिष मुंदडा.साहेब   मा मुख्याध्यापक डिगंबर वाळुंजकर सर कारभारी पेहेरे संस्थेचे अध्यक्ष लक्षण राशिनकर सचिव रामदास नजन.रमेशजी लोखंडे. साहेब अँड देवदान जावळे. संतोष पेहेरे उंदरे ऋषिकेश पेहेरे सतीश लोखंडे संभाजी पंडित  अदि पालक व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक बाळासाहेब पंडित यांनी केली तर सूत्रसंचालन सरोदे सरांनी करून पेहेरे सर यांनी आभार प्रदर्शन केले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला