Ticker

6/recent/ticker-posts

कायदेविषयक मूलभूत ज्ञान असणे अत्यंत गरजेचे : न्यायमूर्ती पी.व्ही सपकाळ

 


प्रतिनिधी :-  विजय गायकवाड

स्थानिक- रिसोड येथील स्व.पुष्पादेवी पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना,महिला विकास समिती, आणि लैंगिक अत्याचार व अँटी रॅगिंग समिती,तालुका विधी सेवा समिती,वकील संघ रिसोड,यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ.एम.एन.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी डॉ.आदिनाथ बदर हे होते.तर प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून मा.न्यायमूर्ती पी.व्ही.सपकाळ,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती रिसोड तथा दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग रिसोड,मा.डी.एम.गायकवाड सहदिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग रिसोड, ॲड एम.डी.सरनाईक  अध्यक्ष,तालुका वकील संघ रिसोड.ॲड सागर इरतकर डॉ.केशव कोकाटे रासेयो कार्यक्रमाधिकारी यांची मंचावर उपस्थिती होती.

आपल्या भाषणातून न्यायमूर्ती मा.पी.व्ही.सपकाळ  यांनी कायदा म्हणजे काय ते सांगून कायद्याचे मूलभूत ज्ञान किंवा तोंड ओळख सर्वांनाच असली पाहिजे असे सांगितले. बालविवाहाच्या संदर्भामध्ये बाल प्रतिबंधक कायद्याची आवश्यकता सांगताना बालविवाहाची कारणे, स्त्री शिक्षण यावरही प्रकाश टाकला. न्यायमूर्ती डी.एम. गायकवाड साहेब यांनी 'लेक लाडकी' 'माझी कन्या भाग्यश्री कन्या' 'कस्तुरबा गांधी' अशा विविध प्रकारच्या कल्याणकारी योजनांची तसेच स्त्रीविषयक कायद्यांची सविस्तर माहिती दिली. व विद्यार्थिनींनी याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहनही केले. ॲड  इरतकर यांनी 'गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व निदान तंत्र कायदा' याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मा. एम.डी सरनाईक, सूत्रसंचालन डॉ.केशव कोकाटे तर आभार प्रा. पल्लवी देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.