Ticker

6/recent/ticker-posts

शालेय व्यवस्थापन समितीची मागणी : सहशिक्षक शेरेकर यांची तोंडी प्रतिनियुक्ती रद्द करा, अन्यथा शाळेला कुलूप



हदगाव प्रतिनिधी:-देवानंद महाजन 

हदगाव तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वाळकी खुर्द येथील सहशिक्षक श्री. शेरेकर यांची दुसऱ्या शाळेत केलेली तोंडी प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीने केली आहे. याबाबत समितीने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांना मूळ शाळेतच राहण्याचे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश असूनही श्री. शेरेकर यांची तोंडी प्रतिनियुक्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुद्रुक (केंद्र आष्टी) येथे करण्यात आली आहे. ही प्रतिनियुक्ती रद्द करून संबंधित शिक्षकांची मूळ शाळेत रवानगी करण्यात यावी, अशी मागणी समितीने केली आहे.

प्रतिनियुक्ती लवकरात लवकर रद्द न झाल्यास शिक्षणाधिकारी, नांदेड यांच्याकडे लेखी तक्रार करू आणि शालेय व्यवस्थापन समिती व गावकरी मिळून शाळेला कुलूप लावू, असा इशारा समितीने निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर कदम, उपाध्यक्ष भगवान गायकवाड, सरपंच शिवाजी कदम, भगवान कदम, आकाश शिंदे, उल्हास कदम, बालाजी कदम, भगवान गायकवाड यांच्यासह एकूण २३ जणांच्या सह्या आहेत.