जालना, प्रतिनिधी – कैलास कोल्हे
जालना: लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट अंतर्गत कार्यरत टास्क फोर्स टीम, जालना–I यांच्या वतीने भाटेपुरी येथील जिजामाता शाळेत गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी ‘गुड टच – बॅड टच’ या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळेत टास्क फोर्स टीमच्या ज्येष्ठ सदस्य कुमारी आरती बालाजी आरेकर यांनी प्रभावी व समर्पक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, योग्य व अयोग्य स्पर्शाची ओळख करून देणे तसेच आत्मविश्वास वाढवणे हा या सत्राचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेचा लाभ एकूण ८४ विद्यार्थ्यांनी घेतला. त्यामध्ये ५० आनंदो व ३४ नॉन-आनंदो विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भाटेपुरी केंद्रातील चार टास्क फोर्स सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. शाळेची पूर्वपरवानगी घेण्यापासून ते कार्यशाळेचे नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतची संपूर्ण जबाबदारी टास्क फोर्स टीमने समर्थपणे पार पाडली.
या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी समाधान व्यक्त करत समाजासाठी संवेदनशील व जबाबदार युवकांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. लाइट ऑफ लाईफ ट्रस्ट व टास्क फोर्स टीम, जालना–I यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





Social Plugin