Ticker

6/recent/ticker-posts

पारनेर स्थित मुंबईकरांचा रविंद्र राजदेव यांना जाहीर पाठिंबा.



कामोठे -पारनेर प्रतिनिधी                            

   पारनेर तालुक्यातील बहुतेक जण व्यवसायानिमित्त तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबई ह्या ठिकाणी वास्तव्यास आहेत परंतु आपल्या मायभूमीकडे बारकाईने लक्ष असत ,गावच्या जडण घडण मध्ये मुंबईकर हा केंद्रबिंदू मानला जातो.कोणत्याही पठारभागावातील गावात मुंबईकर आल्याशिवाय काहीच निर्णय गावातले मंडळी घेत नाहीत मनून पारनेर तालुक्याचे राजकारण नक्कीच मुंबईतून हालते .

            सन 2019 ला लोकनेते निलेश लंके साहेब यांनी सुद्धा मुंबई कामोठे मधूनच विधानसभेची घोषणा केली आणि तब्बल ह्या लढाईत 61000 हजार मतांनी त्यांचा विजय झाला त्याही निवडणुकीची धुरा सगळी मुंबईकरांच्या खांद्यावर होती .

              असाच एक भाग मनून होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहे आणि टाकळी ढोकेश्वर गटातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर लढत असलेल्या इच्छुक उमेदवार सोनिया राजदेव यांचे पती रविंद्र राजदेव यांनी मुंबईमध्ये आपल्या मित्रपरिवाराच्या गाठी भेटी तसेच मतदार राजाच्या गाठीभेटीवर जोर दिला असून गेली वर्षभरापासून मुंबईकर त्यांचे सर्वसामान्य जनतेची केलेली कामे पाहत असल्यामुळे मुंबईकरांचा त्यांना जाहीर पाठिंबा मिळत आहे .

            रेशनकार्ड ,बांधकाम कार्ड ,आरोग्य शिबिरे,वृद्धापकाळ पेन्शन योजना ,नुकसान भरपाईच्या माध्यमातून गेली वर्षभरात राजदेव यांनी अनेक लोकांना मदत मिळवून दिली आणि सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईद बनले आहेत.त्यांचं काम मुंबईकर रोज पाहत आहे ,एक सर्वसामान्य घरातील माणूस एवढी कामे करतो ,लोकांच्या अडचणीच्या काळात धावून जातो याचा आनंद मुंबईकर यांना आज आहे त्यामुळं ट्रान्सपोर्ट व्यावसायिक , सी एच ए मंडळ यांनी राजदेव यांना निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिला आहे .

      राजेंद्र ठुबे ,विलास घोलप ,अर्जुनशेठ डांगे,अशोकशेठ आहेर ,नानाभाऊ निमसे ,शंकरशेठ चिकने,दिनेशशेठ घोलप ,

आबासाहेब भोर ,बाळासाहेब वाफारे ,दत्तात्रय वाबळे ,अशोक खोसे ,बाळासाहेब खोसे ,स्वप्नील चौधरी ,संदीप चौधरी ,बाबू चौधरी ,रमेश घोलप ,कुलदीप देशमाने ,प्रथमेश पुंडे ,,गोपीनाथ शिंदे ,शरद जगताप ,ठकाजी वाफारे ,दत्तात्रय निमसाखरे ,गणेश वाबळे,कैलास वाबळे ,शिवाजी दाते ,प्रशांत चिकने, गोरखशेठ आहेर ,भाऊसाहेब आहेर सर,गंगाराम शिंदे , शरदशेठ गुंड ,संतोष उंडे साहेब ,ज्ञानदेव चौधरी ,चंद्रकांत नवले ,आदी अनेक मान्यवरांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला .