बुध दि [प्रकाश राजेघाटगे ] .
विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक उपक्रम शालेय वयापासूनच राबवावेत. वृक्षतोड करताना त्याच्या वेदना आपण समजून घ्याव्यात. अन्न,वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गरजा झाडेच पूर्ण करतात. वनसंपदा सर्वात मोठी संपदा आहे त्याचे जतन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे व ते जगवले पाहिजे. जास्तीत जास्त झाडे लावून जगवणाऱ्या विद्यार्थ्यास विशेष बक्षीस दिले जाईल. विद्यार्थ्यांनी निसर्गाशी मैत्री करावी.निसर्गाची सेवा ही मानवतेच्या सेवेसमान आहे.
असे विचार नाम फाउंडेशन चे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री बाळासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले . श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे राष्ट्रीय हरित सेना आयोजित पर्यावरण पूरक उपक्रमात ते बोलत होते.
यावेळी वनपाल सामाजिक वनिकरण (वडूज )श्री राजेंद्र आवारे यांनी पर्यावरण पूरक कविता सादर केल्या.वनपाल सामाजिक वनिकरण (वडूज ) श्री सागर कुंभार यांनी वनसंपदेचे महत्त्व सांगून ते जपण्याचे आवाहन करून स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय हरित सेनेच्या विविध उपक्रमांतर्गत यावेळी विद्यालयात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, इत्यादींची आयोजन करण्यात आले होते. यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव, सचिव श्री मोहनराव जाधव,खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,सर्व संस्था पदाधिकारी व गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य श्री.डी. एन.गोफने यांनी स्वागत केले. श्री मोहनराव गुरव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास वनरक्षक श्री आनंदराव चव्हाण व श्री भरमन्ना कोळी उपस्थित होते. श्री घुगरे वाय. ए. व श्री जाधव बी. एस. यांनी सूत्रसंचालन केले.सौ. अमृता जाधव यांनी आभार मानले.





Social Plugin