जिल्हा परिषद शाळा बुधमधील चिमुकल्यांचा बाजार उत्साहात, ना . महेश शिंदेंनी केली खरेदी
बुध , दि. (प्रकाश राजेघाटगे )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुध, ता. खटाव येथे बालबाजार भरवण्यात आला, बाजार लहानग्यांचा आणि खरेदी मोठ्यांची होती. या बाल बाजारात विद्याथ्यांनी पालेभाज्या, हरभरा , मकर संक्रातीला लागणारे साहित्य , भेळ, पाणीपुरी, शेंगा, कांदा, खाण्याच्या वस्तू , खेळणी, स्टेशनरी साहित्याची दुकाने थाटली होती. या बालबाजारात ५१३०० रूपयांची उलाढाल झाली .
बाजाराचे उद्घाटन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना . महेश शिंदे सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे , गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते , विस्ताराधिकारी शिवाजी कदम , केंद्र प्रमुख अजित निकाळजे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , माजी प्राचार्य के .डी. पवार , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , उपाध्यक्ष श्रद्धा पवार , माजी केंद्र प्रमुख नितीन खोत , ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते. गावातील महिलांनी खरेदीचा आनंद घेतला, ग्रामस्थांनी व पालकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे बाजार गजबजलेला होता, लहान मुलांना आर्थिक गणित समजणे गरजेचे आहे. तसेच त्यांना अभ्यासाबरोबर व्यावहारिक ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील काळात कोणत्याही प्रकारच्या अडचणोंना सामोरे जाताना कमीपणा भासत नाही. तसेच शाळेने जिल्हयातील शाळेसमोर नवा आदर्श ठेवला आहे. जिल्ह्यातील शाळांनी असा नवीन प्रयोग करावा, असे आवाहन सरपंच सुजाता बोराटे यांनी केले. बाल बाजार उपक्रमामुळे सर्व मुलांच्या व्यवहार ज्ञानात भर पडेल. अशा उपक्रमामुळे पालकवर्गही शाळेत येऊ लागले आहेत. अशा उपक्रमांतून शाळेच्या प्रगतीचा आलेख उंच जात राहिल, असा विश्वास ना . महेश शिंदे यांनी व्यक्त केला. सर्व मुला-मुलांनी स्वतःच्या घरी पिकणाऱ्या पालेभाज्या, केळी, कांदे, शेंगा, अशा निवड वस्तू आणल्यामुळे बाजारात सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. समाज संपर्क शेती व शेतकरी यांच्याविषयी प्रेम वाढावे व स्वतः अर्थार्जन करावे, हा उद्देश या आयोजनातून साध्य झाला असल्याचे मुख्याध्यापक माधुरी नलवडे यांनी सांगितले . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक माधुरी नलवडे ,जितेंद्र जगताप ,दत्तात्रय जाधव , दमयंती अब्दागिरे , उमा रणसिंग , नितीन घनवट , दिपाली घनवट , अनिता मोरे , मनिषा मेळावणे यांनी परिश्रम घेतले . .





Social Plugin