Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल निधी अभावी लाभार्थी बेजार .

     




संतोष वाठोरे सेनगाव प्रतिनिधी हिंगोली     

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन ते तीन महिन्यापासून प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे निधी अभावी घरकुलचे काम रखडले आहे.    सविस्तर माहिती अशी आहे की हिंगोली जिल्ह्यात चारही तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे निधी रखडले आहेत. पंचायत समिती मध्ये वारंवार चकरा मारूनही काहीच कळतं नसल्याने सर्वच लाभार्थी बेजार आहेत. घराचे अर्धवट काम झालेले आहेत व त्यासाठी कुणी कर्ज घेतले आहेत ते कसे फेडायचे या चिंतेत सर्व लाभार्थी आहेत. सर्व सामान्य जनतेतून माननीय मुख्यमंत्री यांना विनंती आहे की आपण या मध्ये लक्ष घालून लवकरात लवकर घरकुल लाभार्थ्यांना निधी वितरित करावा.