●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर
●बिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव येथील सौ. मंजुळाबाई माध्यमिक विद्यालयात सोमवार दि.१२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील इला फाउंडेशनचे चिञकला सहभागी प्रमाणपत्र मान्यवरांकडून प्रदान करण्यात आले.मराठीचे सहशिक्षक कदम यांनी
माँ जिजाऊ यांची शौर्यचरित्र भाषणरूपी एकटाकी सादर केले.
समाजात घुबड या पक्ष्यासंदर्भात असणारे गैरसमज व होणारी तस्करी याबाबत संवर्धन,मार्गदर्शन व्हावे म्हणून इला फाउंडेशन,टाटा मोटर्स व पिंगोरी,ता.पुरंदर येथील ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 'आऊल फेस्टिव्हल' भरविण्यात येते.त्यात खतगांव येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा चिञरूपाने सहभाग राहिला आहे.भारतातून आलेल्या तब्बल तीस हजार घुबडांच्या चिञ प्रदर्शनात सदरील शाळेतील मुलांच्या चिञांचा समावेश करण्यात आला होता.या शाळेचे प्राचार्य पिन्नरवार एम.जी,शिक्षक प्रकाश बुध्देवार यांनी
या स्पर्धेस मुलांना उद्युक्त करीत सहभागास प्रोत्साहन दिले.
सदरील महापुरुष जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, विद्यार्थी, शिक्षक मनोगत,प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास प्राचार्य पिन्नरवार एम.जी.,प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी कवी,गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर, सर्पमित्र राजेश मुंडकर,शिक्षक पतपेढीचे पदाधिकारी कदम सर, जिलानी येवतीकर, शादुल्ला शेख, वळगकर, माळेगावे, भालेराव, व्यंकट खतगांवकर, प्रा.अशोक पाटील, प्रा.देवणे,प्रा.शिंदे,प्रा.व्ही.पी.पाटील, प्रा.शुभम मठपती, प्रा.गायकवाड ,शेट्टीवार, वासरे, कदम, शिंदे, केंद्रे,पाटील मॅडम,आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यावेळी उपस्थित होते.





Social Plugin