Ticker

6/recent/ticker-posts

शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या दिनदर्शिकेचे अनावरण रविंद्र राजदेव यांच्या शुभहस्ते.



पारनेर प्रतिनिधी.

       शिवनेरी सेवाभावी संस्था उलवे ह्या संस्थेचे २०२६ सालची दिनदर्शिका संस्थेच्या वतीने पारनेर तालुक्याचे युवा नेते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष व टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे भावी सदस्य,समाजभूषण पुरस्कार विजेते रविंद्र राजदेव यांच्या हस्ते पार पडला.

             शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून उल्वे ह्या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी होत असतात आणि त्या माध्यमातून शिवजयंती ,गुढीपाडवा असे अनेक उपक्रम दिशादर्शक होत असून ,सामाजिक कार्याला चालना देत असतात ,संस्थेच्या माध्यमातून अनेक गोर गरीबाला मदत तसेच अनेक अडचणीच्या माणसाला ही संस्था नेहमी मदत करत असते आणि तोच विश्वास ह्या सेवाभावी संस्थेने जपला आहे.

            प्रकाशन करतेवेळी रवींद्र राजदेव म्हणाले की ,ह्या शिवनेरी संस्थेचा आदर्श घेण्यासारखी संस्था आहे ,ह्या संस्थेच्या माध्यमातून जे उपक्रम राबविले जातात त्यामध्ये शिवजयंतीच्या वेळी ढोल पथक घेऊन मतभागिनी ह्या उपक्रमात सहभागी होऊन एकतेचा संदेश ह्या माध्यमातून मिळत असतो ही संस्था एक आदर्शवत सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था असून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.