Ticker

6/recent/ticker-posts

राज्याने कणखर नेता गमावला ,आ. डॉ, प्रज्ञाताई सातव



महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे एक धडाडीचे आणि अभ्यासू नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण गमावले आहे, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, निर्णयक्षमतेत धाडस आणि जनतेच्या प्रश्नांबाबत प्रामाणिक बांधिलकी दिसून येत होती. राज्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय, विविध महत्त्वाच्या खात्यांमधील त्यांचे योगदान आणि प्रशासनावरील त्यांची पकड यामुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्याने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष आणि कणखर नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, हीच खरी श्रद्धांजली.