ग्रामीण प्रतिनिधी - छगन जाधव
याच ग्रामपंचायतीतील एक तांडा पळशी तांडा हे विकासापासून खूप दूर आहे तांडा वस्तीकडे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा खूप दुर्लक्ष आहे. या गावात पिण्यायोग्य पाणी नाही पाणीटंचाई सतत आहे . त्या दूषित पाण्यामुळे खूप लोक आजारी पडतात . पण तेही पाणी वेळेवर भेटत नाही रस्त्याचे हाल बेहाल आहे . खूप मोठे खड्डे हनुमान मंदिराच्या बाजूला रस्ता असून त्या रस्त्यावर घाण पाणी सतत वाहत असतो आणि त्यामुळे दुचाकी वाहन ग्रामीण भागात बैलगाडी यांना खूप त्रास होतो ग्रामपंचायत मधील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना सांगून सुद्धा त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करतात फक्त निवडणूक च्या वेळीच त्यांना तांडा आठवतो या गावात एक साधी नाली सुद्धा नाही फक्त आश्वासन आहे आज पर्यंत या गावात काहीच विकास झालेला नाही गावातील लोक या रस्त्यामुळे या सांडपाण्यामुळे वैतागले आणि गरीब शेतमजूर दुर्गम भागातील लोक खूप आजारी पडतात आणि त्यांची केलेली मजुरी दवाखान्यात टाकतात.या वाहणाऱ्या घाण पाणी ला गावाच्या बाहेर काढण्यासाठी एक साधी नाली सुद्धा नाही लोकांना गाडी चालवताना त्यांचा मनात भीती निर्माण झालेली आहे या रस्त्यामुळे .





Social Plugin