बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या आठव्या सत्रातील उद्यांनदुतांनी ग्रामीण उद्याविद्या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत बुध येथे पशुआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जगदाळे , तसेच सरपंच सौ. सुजाता बोराटे आणि उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे उपस्थित होते.
त्यानंतर डॉ. नितीन जगदाळे यांनी लम्पी रोगाचा प्रादुर्भाव, त्याचा होणारा प्रसार, तसेच या रोगाचे लसीकरणाबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी गोठ्याचे नितुकीकरण कसे करायचे याबद्दल माहिती दिली. या उपक्रमासाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जगदाळे, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी मा. डॉ.जे. व्ही. लेंभे , मा.डॉ.ए.आर.पाटील समन्वयक मा.प्रा.ए.डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानदुत
आदेश जाधव , गौरव डांगे ,मयुर गाढवे , प्रणव भोसले , रोहन बनकर , राम भोईटे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.





Social Plugin