Ticker

6/recent/ticker-posts

नवीन वसाहत येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.



यशवंत पवार @छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवीनवसाहत येथे दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी प्रभात फेरीने झाली. त्यानंतर ध्वजारोहणाचा सोहळा मुख्याध्यापिका श्रीमती अपर्णा धाटबळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी अध्यक्ष म्हणून अण्णा सर्जेराव बनकर, तर उपाध्यक्ष म्हणून श्री.भैय्यासाहेब भीमराव घाटगे उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी भाषणे तसेच पथनाट्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे पथनाट्य ठरले. विद्यार्थ्यांनी गावातील चौकात सादरीकरण करून नागरिकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, महिला पालक तसेच ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले व सामूहिक छायाचित्र काढण्यात आले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी शाळेच्या शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक शिक्षिका श्रीम.किरण सोमदे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.