बिलोली ~ तालुक्यातील एक आनंदाची गोष्ट ती म्हणजे मराठी पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेने ७ राज्य पातळीवरील पत्रकार प्रेरणा हा २०२६ चा पुरस्कार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांना जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये या पुरस्कारांची घोषणा संघटनेचे केंद्रीय सचिव अतुल होनकळसे, प्रदेश सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत यांनी केली आहे. ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचा पुरस्कार वितरण सोहळा परीवर्तन सभागृह शामनगर अंबाजोगाई रोड डॉ. जटाळ हॉस्पिटल मागे लातूर येथे १८ जानेवारी रोजी दुपारी २ ते ६ यावेळेत होणार आहे. जितेंद्र पराडकर, रत्नागिरी, प्रा. एल.डी.सरोदे, अकोला, राजेंद्र कांबळे, नांदेड, केदार पाथरकर, पूर्णा, परभणी, शेख अफसर शेख सत्तार पूर्णा, विलास जोशी, हिंगोली, सचिन आव्हाड, दौंड, पुणे या ज्येष्ठ पत्रकारांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार जितेंद्र दत्तात्रय पराडकर, संगमेश्वर, संपादक नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार विलास चंद्रकात जोशी, हिंगोली, पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पुरस्कार प्रा. एल.डी. सरोदे, अकोला, मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार सचिन जगन्नाथ आव्हाड, दौंड, पुणे, नवीन सोष्ट्ये वरिष्ठ पत्रकार स्मृती प्रेरणा पुरस्कार राजेंद्र सत्यनारायण कांबळे, बिलोली, नांदेड, मधू रावकर शहर युवा पत्रकार प्रेरणा पुरस्कार केदार मल्लिकार्जुन पाथरकर, पूर्णा, एजेएफसी जीवन गौरव पुरस्कार उमरदराज खान, लातूर जिल्हाध्यक्ष या महनीय व्यक्तींच्या नाव हे पुरस्कार देण्यात येतात. त्यांना हे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मित्रपरिवार व तसेच पत्रकार बांधवांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षा होत आहे.





Social Plugin