बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पश्चिम महाराष्ट्र मध्ये आपल्या आक्रमक भूमिका व सत्यासाठी आंदोलनात्मक लढणारे लोकशाहीचे पाईक श्री रमेश अनिल उबाळे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत रिपब्लिकन सेना प्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून निवड झाली आहे. हा पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी गौरवशाली बाब ठरल्याचे मत जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये गेले पंचवीस वर्षापासून सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादी आणि इतर सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणावर अत्यंत कडाडून विरोध करण्यात आला होता .एवढेच नव्हे तर वेळेप्रसंगी कोरेगाव तालुक्यात व सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रिपब्लिकन सेनेचे सचिव विनोद काळे यांनी आज स्टार प्रचारकांची माहिती प्रसिद्ध केली .यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, युवा नेते अमन आंबेडकर, राष्ट्रीय महासचिव संजीव बावधनकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी आणि महाराष्ट्राचे नेते रमेश अनिल उबाळे यांच्यासह इतर मान्यवरांचा ही समावेश करण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर विदर्भ, कोकण, कोकण प्रदेश, मुंबई प्रदेश आणि ठाणे प्रदेश अध्यक्ष यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात महा विकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आश्वासन देऊन सुद्धा त्याची पूर्तता न केल्यामुळे सध्या आंबेडकरी चळवळ त्यांच्यापासून दुरावलेली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून विशेषता शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवशक्ती- भीमशक्ती एकत्र आली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने भगवा आणि निळा ध्वज एकत्रितरित्या फडकून सत्ता हस्तगत करतील. असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी व्यक्त केला आहे.
फोटो- रिपब्लिकन सेनेच्या स्टार प्रचारक पदी निवड झालेले श्री रमेश उबाळे





Social Plugin