गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
दि.०४/०१/२०२६ रोजी अटल अमृत महोत्सव व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून मा.श्री.राजु पाटील राजे यांच्या संकल्पनेतून भुली फाटा ता. मानोरा जिल्हा वाशिम येथील आकांक्षा मतीमंद निवासी वसतिगृह येथे विद्यार्थीना गरम कपडे शालेय बॅग व खाऊ वाटप सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाजपा नेते वाशिम जिल्हा निवडणूक प्रभारी राजु पाटील राजे,भाजपा संयोजक भक्तराज महाराज, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय पाटील काळे, भाजपा मानोरा मंडळ अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, सरपंच गणेश जाधव, विकल पवार जिल्हा कार्यकारिणी सदस्य, डॉ. सुरेश जाधव पोहरादेवी शक्ती केंद्र प्रमुख,सरचिटणीस राजेंद्र देशमुख, अ.ज.ता.अध्यक्ष मनोज खडसे, रामेश्वर ठेंगळे, डॉ.सुहाष देशमुख, सुदामजी तायडे, प्रा.हेमंत देशमुख, संदिपजी काळे, जिग्नेश लोडया, संतोष जाधव, अमोल राऊत,विजय जयस्वाल,ज्ञानेश्वर भगत, डॉ यावलकर, डॉ .हरिष नवहाल, पवण देशमुख, श्याम डोळस, सौरभ राठोड, अमित लोखंडे, दारासिंग पवार, भैय्यासाहेब देशमुख, प्रफुल्ल सोनटक्के, जगदीश राठोड, प्रमोद सावंत, नितिन राठोड, निलेश चौधरी,अतुल राऊत, नितेष लवटे, अंकित बेंद्रे, डॉ. गोवर्धन चव्हाण, रामा भाऊ, रोहिदास चव्हाण, प्रणव माहुरकर, प्रफुल्ल चव्हाण, लखण मावळे, व मोठ्या संख्येने मानोरा पोहरादेवी मंडळाती भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. सुरेश जाधव व विकल पवार यांनी अथक परिश्रम घेतले.
.jpg)




Social Plugin