Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वर्धापन दिन समारंभ निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम.




प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन:*कै. दशरथ बाबा माध्यमिक विद्यालयात ​माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

कै. दशरथ बाबा माध्यमिक विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या मंगलप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. रावसाहेब पाटील दानवे साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल कडसर यांनी केली. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून भारतीय संविधानाबद्दल आदर व्यक्त केला आणि देशप्रती आपली कर्तव्ये मांडली.विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध संगीत कवायतीने उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध हालचाली आणि शारीरिक कसरतींनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 माननीय रावसाहेब पाटील दानवे (दादा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच राष्ट्रहित जोपासावे. भारताला समृद्ध बनवण्यासाठी तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

​कार्यक्रमाच्या शेवटी श्री. एस. पी. गावंडे सर यांनी उपस्थित सर्व पाहुणे, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.