मन्सूर शहा धोत्रा भंनगोजी प्रतिनिधी,:----
आज चिखली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी भाजप-शिवसेना युतीच्या सौ. वैशाली कपिल खेडेकर यांची निवड झाली. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून श्री. सुरेंद्रजी ठाकूर व श्री. सागर पुरोहित यांची निवड करण्यात आली.
या सर्व मान्यवरांचा सत्कार करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. चिखली शहराच्या विकासासाठी त्यांच्याकडून निश्चितच भरीव व लोकहिताचे कार्य घडेल, असा विश्वास आहे. नगर परिषदेमार्फत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही नवी टीम प्रभावी काम करेल, अशी अपेक्षा आहे. निवड झालेल्या सर्वांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. देण्यात आल्या.!!





Social Plugin