बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
वेटणे येथे सुरू असलेल्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ . विजयराव नलवडे ते बोलत होते.व्यासपीठावर वेटणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री.सुधाकर देवकर, उपसरपंच श्री.महेश नलवडे, श्री.संजय नलवडे गटविकास अधिकारी पंचायत समिती खटाव,(वडूज),रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, के.के.घाटगे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अँड.किसनराव खामकर,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद,प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर , प्रभारी प्रा.प्राचार्यडॉ.आर.पी.भोसले, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. के.जी.कुंभार आणि प्रा.डॉ. एच.जी.निमसे ,वेटणे गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणातून प्राचार्य डॉ. विजयराव नलवडे यांनी रयत शिक्षण संस्थेतील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उल्लेख करताना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान, विचार,श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगत असतान गाव स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, गावातील नेतृत्व हे नेहमी शांत व समतोल असावे कारण सामाजिक योगदानाची जाणीव निर्माण होत असते असे सांगितले. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी शिक्षण व संस्कार याची सांगड घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविकात प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे,कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या स्थापनेमध्ये मौजे - वेटणे गावातील लोकांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्यामुळेच शैक्षणिक वाटचाल शक्य झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी श्री.संजय नलवडे यांनी विद्यार्थ्यांनी धाडसाने पुढे येऊन समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, अशा कार्यातूनच विद्यार्थीचा व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो,असे प्रतिपादन केले.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.के.के.घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत,स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा व युवा पिढीने समाजात सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अॅड.किसनराव खामकर यांनी गावातील जीवनपद्धती, ग्रामीण जगणं व सोयी-सुविधांची गरज यावर सखोल भाष्य केले.तरुणांमध्ये श्रमसंस्कार रुजविणे, एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व, संस्कार व संस्कृती जपण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा अधिक बळकट झाल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी मा.श्री.योगेश कदम, गटविकास अधिकारी, यांनी तरुणांनी गावातील लोकांचे जीवनमान समजून घ्यावे,आदर्श नागरिक घडावे व गावातील विविध समस्यांवर प्रत्यक्ष काम करावे, असे मार्गदर्शन केले. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून प्लास्टिक बंदी, स्वच्छता,अभिनय ,जनजागृती उपक्रम राबविणे गरजे आहे.कारण या श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, श्रमाची प्रतिष्ठा व नेतृत्वगुण विकसित होण्यास मोलाची मदत झाली असून गाव व महाविद्यालय यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याची भावना व्यक्त
केली. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एच.जी. निमसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर सेवक वर्ग, शिबिरार्थी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin