चौकशीचे आदेश 4 सदस्य समिती स्थापन
प्रतिनिधी गोपाल चंदनसे
पातूर तालुक्यातील सावरगाव येथे सरकार ने जाहीर केलेल्या अनुदानाचे सर्वे झालेत त्यामध्ये ग्रामसेवक साळोकर आणि कृषी सहायक ताले यांनी पात्र नसलेले लाभार्थी आर्थिक व्यवहार करून बसवले , आणि पात्र लाभार्थी बाद केले त्याची चौकशी करावी म्हणून महादेव पायघन आणि गावातील शेतकरी यांनी दि.7 जानेवारी 2025 रोजी गट विकास अधिकारी तहसीलदार यांच्या कडे तक्रार केली होती आणि आत्मदहनाचा इशारा दिला होता , गट विकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश देऊन 4 सदस्य समिती स्थापन केली त्यामध्ये विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे , कनिष्ठ अभियंता निकेस मोरे , सहाय्यक कार्यक्रम अधिकारी घनश्याम मरकंटेवार , तांत्रिक सहाय्यक अधिकारी दीपक ताले यांच्या समावेश आहे ,12 जानेवारी संध्याकाळ पर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे , आता चौकशी मध्ये काय होते या कडे सर्व शेतकऱ्यांचे आणि सावरगाव वाशियाचे लक्ष लागलेलं आहे





Social Plugin