Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भूतेश्वर विद्यामंदिर, अंबवडे प्रथम..

        


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 ज्ञानश्री इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅड टेक्नाॅलाॅजी ,सातारा येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भूतेश्वर विद्यामंदिर,  अंबवडेची नागपूर येथे संपन्न होणा-या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.भुतेश्वर विद्यामंदिर, अंबवडेचा विद्यार्थी युवराज पवार याने तयार केलेल्या Adjustable Spanner या उपकरणाची  दिव्यांग गटातून नागपूर येथे संपन्न होणा-या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.त्याला प्रणव बुधे याचे सहकार्य मिळाले.या प्रदर्शनामध्ये सातारा जिल्ह्यातून एकूण 121 उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे विज्ञान विभागप्रमुख संदीप त्रिंबके यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुरेंद्रदादा गुदगे,ज्येष्ठ संचालक श्री.नारायण कुबेर, श्री.अरविंद पुस्तके,दिगंबर पिटके,विद्यालयाचे मुख्याध्यापक .श्री.संजय जगताप सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.विश्वजीत घाडगे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.