Ticker

6/recent/ticker-posts

*अंबडमध्ये भव्य हेल्मेट जनजागृती रॅली – राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत*



अंबड प्रतिनिधी : – 

गणेश सपकाळ

वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि दुचाकीस्वारांमध्ये रस्ते सुरक्षा बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अंबड शहरात आज,दि ३ जानेवारी २०२६ रोजी राज्य रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ अंतर्गत भव्य हेल्मेट रॅली आयोजित करण्यात आली.उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

रॅलीची सुरुवात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्या हस्ते करण्यात आली.अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिद्धेश्वर धुमाळ,पोलीस निरीक्षक श्री.संतोष घोडके,जिल्हा वाहतूक शाखा प्रमुख श्री.चंद्रकांत चातुरे,तसेच अंबड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.मनोज उकिरडे,पोउपनि आदिनाथ ढाकणे, विनोद भानुसे व श्री.भीमराज नागरे,विवेक गिल्डा,उमेश भवर यावेळी उपस्थित होते.

रॅलीदरम्यान ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी शहरभर 'हेल्मेट वापरा,जीव वाचवा'असे घोषणांसह मार्गप्रदर्शन केले.या उपक्रमाचा उद्देश फक्त कायद्याचे पालन करणे नव्हे,तर दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेसंबंधी जनजागृती करणे हा होता.

अंबड प्रशासनाने सांगितले की या मोहिमेमुळे शहरातील वाहनधारकांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांविषयी सकारात्मक संदेश पोहोचला असून,भविष्यात अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाईल.