Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर दे. माही येथे वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.

 


प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. माही येथे वर्ग 10मध्ये सण 2025-26 याशैक्षणिक वर्षात एकूण 102 विदयार्थी शिक्षण घेत होते सराव परीक्षा संपवत आज विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमचे अद्यक्ष प्राचार्य आदरणीय श्री प्रकाशजी इंगळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री खेडेकर सर, श्री रोहित पऱ्हाड सर, श्री पडघान सर, श्री केशव तळेकर , सौं दूंगड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात विद्येची आराध्य दैवत माता सरस्वती याच्या पूजनाने करून.सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून करण्यात आली.

त्यांननंतर विदयार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व शिक्षक वर्गाचे आभार व्यक्त करत शिक्षकांचे आजपर्यंत मिळालेले मार्गदर्शन हे आम्हाला जीवनभर उपयोगाचे राहील शाळेत निघून गेलेल्या दिवसाला उजाळा देत हे दिवस आमच्या जीवनातील अत्यंत आनंदायी होते हे दिवस आमच्या जीवनातील परत न येण्यासाठीचे होते हे सांगत विद्याऱ्यांनी डोळयात अश्रू आणले. अत्यंत बालपनापसून जुळलेली सहरकाचे नाते व येथील शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन आमच्या जडघडणीत नक्कीच मोलाचे असेल असे उदगार काढत मुलांनी पुन्नच सर्वांचे आभार व्यक्त केले.तर शाळेत निघून गेलेले बालपनातील दिवस किती महत्वाचे असतात हे सांगत श्री डोईफोडे सर यांनी आपली एक सुंदर कविता सादर केली lत्यानंतर शाळेचे प्राचार्य आदरणीय इंगळे सर यांनी वर्ग 10 च्या सर्व मुलांना परीक्षेत यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा देत भावी आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री केशव तळेकर सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री गणेश चेके सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षक्केत्तर कर्मचारी व खासगी बसचे चालक यांनी परिश्रम घेतले.